‘आरोपीची संपत्ती पाडणं, हे संविधानावर बुलडोझर चालविण्यासारखं’, न्यायाधीशांचं परखड भाष्य
नागपूरमध्ये दंगल भडकविणाऱ्या आरोपींकडून नुकसान वसूल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुयान यांनी विविध राज्यांतील आरोपींच्या घरांवर होणाऱ्या बुलडोझर कारवाईवर टीका केली. त्यांनी ही कारवाई संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगितले.