इलॉन मस्क यांच्या ‘ट्रम्प प्रेमा’चा टेस्लाच्या विक्रीवर परिणाम; युरोपमध्ये वाहनविक्री घटली
एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या वाहनविक्रीला युरोपमध्ये मोठा फटका बसला आहे. मस्क यांची ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे डेन्मार्कमधील त्शेर्निंग आणि युरोपमधील रॉसमन कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यातील टेस्ला वाहने परत दिली आहेत. मस्क यांच्या राजकीय सक्रियतेमुळे टेस्लाची विक्री कमी झाली असून ब्रँड इमेजला धक्का बसला आहे.