‘मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता’, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नेत्यानाहूंची खरडपट्टी
पश्चिम आशियातील इराण संघर्ष अद्याप सुटलेला नसतानाच इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला गटाविरोधात सशस्त्र कारवाईची तयारी केली होती. यावर इराणने आक्षेप घेतल्याने अमेरिका-इराण शस्त्रसंधी धोक्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून नाराजी व्यक्त केली.