ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर आता त्यांच्याच सरकारमधले उच्चाधिकारी; पॅम बाँडी यांची हकालपट्टी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच त्यांच्या प्रशासनातील तीन उच्चाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. यात अॅटर्नी जनरल पॅम बाँडी यांचा समावेश आहे. एपस्टिन फाईल्स प्रकरण योग्यरीत्या हाताळले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या Truth अकाऊंटवरून बाँडी यांना हटवल्याची माहिती दिली. त्यांच्या जागी डेप्युटी अॅटर्नी जनरल टॉड ब्लेंच यांची नियुक्ती करण्यात आली आहे.