व्हेनेझुएला नंतर आता इराणच्या तेलावर ट्रम्प यांची नजर? म्हणाले, ‘माझी सर्वात आवडती गोष्ट’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करून तेलसाठ्यांचा ताबा घेतला होता. आता त्यांनी इराणच्या तेलाशी निगडित सुविधांवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू व्यक्त केला आहे. इराणचे खर्ग बेट ताब्यात घेण्याची योजना ट्रम्प यांनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.