“…तर एका रात्रीत इराण नष्ट करू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा अंतिम इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे सोडून देण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या धाडसी बचाव मोहिमेत इराणमध्ये अडकलेल्या एका वैमानिकाची यशस्वी सुटका करण्यात आली. सीआयएने फसवणूक मोहीम राबवून ही सुटका केली.