रशियावरील निर्बंधांच्या विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी; भारत, चीनला मोठा धक्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंधांच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची तयारी आहे. या निर्णयाचा गंभीर परिणाम भारत, चीनसह इतर देशांवर होऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाला या विधेयकामुळे नवीन अधिकार मिळाले आहेत.