“इराणच्या मदतीने किंवा मदतीशिवाय हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; ट्रम्प यांचा इशारा
अमेरिका-इराण युद्धविरामानंतरही होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप खुली नाही. इस्रायल-लेबनॉन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच खुली करण्याचा इशारा दिला आहे. इराणला टोल वसूल करू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाटो मित्रदेशांकडून मदत नसल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.