प्राचीन इराणमधील टरकॉइज्ड ग्लेझ्ड वेअर सापडले, एलिफंटाच्या उत्खननात; इतिहास काय सांगतो?
एलिफंटा बेटाचे महत्त्व केवळ तेथील भव्य लेण्यांपुरते मर्यादित नसून, ते प्राचीन जगातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते, याचे ठोस पुरावे नुकत्याच झालेल्या उत्खननातून हाती आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन इराणमधून आलेली वैशिष्ट्यपूर्ण भांडी सापडली आहेत. शिवाय तत्कालीन कालखंडातील राजसत्ता स्पष्ट करणारी नाणीही सापडली आहेत.