एलॉन मस्क यांच्या आई सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील!
टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क सध्या मुंबईत आहेत. त्यांनी मुंबईत आपला ७७ वा वाढदिवस साजरा केला. माये मस्क यांनी 'ए वुमन मेक्स अ प्लान' या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनासाठी मुंबईत येऊन सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. जॅकलिनने माये मस्क यांच्या पुस्तकातील महिलांच्या संघर्षाचे कौतुक केले.