“सेक्स, ड्रग्ज आणि…”, एलॉन मस्क यांना अडकवण्यासाठी रशियातल्या हेरांचं षडयंत्र काय?
अमेरिकेच्या FBI चे माजी एजंट जोनाथन बुमा यांनी दावा केला आहे की रशियातील हेरांनी एलॉन मस्क यांना अडकवण्यासाठी कट रचला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या योजनेला मान्यता दिली होती. युक्रेन-रशिया युद्धानंतर मस्क आणि पेपालचे सहसंस्थापक पीटर थिएल यांच्यावर नजर ठेवली जात होती. ब्लॅकमेलिंगसाठी मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.