इन्स्टाग्रामवर प्रेम जडलं, ४ मुलांची आई प्रियकराबरोबर पळाली; पण मुलांच्या आर्त हाकेने…
गोरखपूरमधील ४० वर्षीय महिला चार मुलांना सोडून इन्स्टाग्रामवर भेटलेल्या २८ वर्षीय तरुणाबरोबर फरार झाली. पतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. पती आणि मुलांनी भावनिक साद घातल्यावर महिला घरी परतली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर महिलेने पतीच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.