‘नेत्यानाहूंची मदत बंद करा’, इस्रायलला लष्करी मदत करण्याविरोधात अमेरिकेत विरोध वाढला
अमेरिकेतील सिनेटर बर्नी सँडर्स यांनी इस्रायलला दिली जाणारी लष्करी मदत थांबवण्याचा ठराव मांडला आहे. इस्रायलने गाझा, वेस्ट बँक, इराण, लेबनॉनवर हल्ले करून हजारो लोकांचा बळी घेतला आहे. अमेरिकन नागरिक आणि सिनेटर याविरोधात आवाज उठवत आहेत. सँडर्स यांनी इस्रायलच्या युद्धखोरीवर टीका केली आणि करदात्यांचा पैसा जबाबदारीने वापरण्याची मागणी केली.