तुमचा PAN अन् UAN नंबर सुरक्षित आहे का? सरकारी डेटा खासगी कंपन्यांकडे कसा पोहोचला?
₹१०० रुपयांत नागरिकांचा EPFO आणि ITR डेटा खासगी कंपन्यांना मिळतोय? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे या गंभीर प्रकरणी उत्तर मागितले आहे. PAN आणि UAN द्वारे कर्मचाऱ्यांची गोपनीय आर्थिक माहिती, रोजगाराचा इतिहास आणि ITRची माहिती अनधिकृतपणे विकली जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. DPDP कायदा २०२३ आणि पुट्टास्वामी निकालाच्या पार्श्वभूमीवर हा नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारावर मोठा हल्ला मानला जात आहे. याप्रकरणी नक्की काय घडले आहे आणि तुम्ही तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवू शकता, ते जाणून घ्या.