IAS अधिकारी असल्याचं भासवून नवऱ्यासह अनेकांना गंडवलं; एका रीलमुळं फुटलं बिंग
भोपाळमध्ये तृप्ती सिंह राजपूत नावाच्या ३० वर्षीय महिलेने स्वतःला आयएएस अधिकारी म्हणून भासवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हे प्रकरण उघडकीस आले. तृप्तीने सरकारी नोकऱ्या आणि हॉटेल्स लीजवर देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवले. पोलिसांनी तृप्ती आणि तिच्या भावाला अटक केली असून तिच्या घरातून बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.