Fastag चा स्टिकर कायम ठेवून आता सेवा देणारी बँक बदलता येणार? One Tag प्रक्रिया नेमकी काय?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 'OneTag' नावाची फास्टॅग पोर्टेबिलिटी सेवा सुरू केली आहे. यामुळे वाहनावरील फास्टॅग स्टिकर न बदलता दुसऱ्या बँकेशी जोडता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये या सुविधेची घोषणा केली. फास्टॅग पोर्टेबिलिटीमुळे सेवा देणारी बँक बदलणे सोपे होईल आणि खर्च कमी होईल.