विंग कमांडर नमांश सियाल यांना पत्नीचा हवाई दलाच्या गणवेशात शेवटचा सॅल्यूट
दुबईतील एअर शो दरम्यान स्वदेशी तेजस लढाऊ विमानाच्या अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील गावी आणण्यात आले. त्यांच्या पत्नी अफसान यांनी साश्रू नयनांनी शेवटचा सॅल्यूट दिला. लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.