“आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने देशभरात दुःख व्यक्त केलं जात आहे. गौतम अदाणी आणि आनंद महिंद्रा यांनीही शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा हे केवळ व्यावसायिक नेते नव्हते, तर त्यांनी भारताच्या अखंडतेला, करुणा आणि चांगल्या गोष्टींना मूर्त रूप दिलं.