सिंधु जल करारासंबंधीच्या भारताच्या अटी शर्थींवर चर्चा करण्याची पाकिस्तानाची तयारी
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्लेखोर पाकिस्तानचे असल्याचे समोर आल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला. पाकिस्तानचे जलसंधारण सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या निर्णयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताने २०२३ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानला नोटीस दिली होती, परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचे आवाहन केले आहे.