IT कंपनीच्या पाळणाघरातील चिमुकल्या मुलांवर अघोरी अत्याचार, व्हिडीओ व्हायरल
बंगळुरूच्या केपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या संकुलातील पाळणाघरात लहान मुलांवर अमानुष अत्याचार झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पाळणाघरातील कर्मचाऱ्यांनी मुलांना वॉशिंग मशीनमध्ये बसवणे, शौचालयात कोंडणे आणि टॉयलेट जेट स्प्रेने पाणी मारणे असे प्रकार केले. या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर केपजेमिनीने पाळणाघराची सुविधा तात्पुरती बंद केली आहे.