ॲम्युझमेंट पार्कमधील जायंट व्हील कोसळून ५ पर्यटक जखमी, अपघाताचा थरारक Video Viral
केरळच्या तिरुवनंतपुरम येथील वेंबयम ॲम्युझमेंट पार्कमध्ये जायंट व्हिल राइड कोसळून पाच जण जखमी झाले, ज्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. बकरी ईदच्या सुट्टीमुळे पार्कमध्ये मोठी गर्दी होती. वेल्डिंग सांधे आणि लोखंडी स्ट्रक्चर नादुरुस्त झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.