फ्लायदुबईतील थरारामुळे कॉकपिट सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एअरलाईन्सच्या सुरक्षेचे नियम काय?
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ३० सप्टेंबरला ओमानी सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. मच्छार यांनी प्रसंगावधान राखून कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे प्रवाशांनी हल्लेखोराला रोखले. या घटनेमुळे कॉकपिट सुरक्षा आणि अंतर्गत धोका यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ९/११ नंतर कॉकपिट सुरक्षा कडक करण्यात आली, परंतु अंतर्गत धोका रोखणे अद्याप आव्हानाचे ठरत आहे.