मुंबईत धक्कादायक प्रकार! परदेशी तरुणीचा टोळक्याकडून पाठलाग
मुंबईत परदेशी तरुणी इनेस फारियाला काही तरुणांकडून त्रास दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इनेसने तिच्या इंस्टाग्रामवर हा अनुभव शेअर करत नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, "मी अनेकदा नकार दिल्यानंतरही ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाठलाग करत राहिले आणि फोटोसाठी आग्रह करत होते." या घटनेनंतर महिला सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे.