FSSAI ची ‘एव्हरेस्ट’सह ‘लालजी गोधू’ कंपनीच्या हिंग विक्रीवर बंदी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स आणि लालजी गोधू यांच्या हिंगाच्या निकृष्ट दर्जाबद्दल कारवाई केली आहे. तपासणीत हिंगामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी अल्कोहोलमध्ये विरघळणारा अर्क आणि जास्त स्टार्च आढळला. त्यामुळे या ब्रँड्सच्या हिंग विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच एव्हरेस्टचे अंडा करी मसाला, चिकन मसाला आणि गरम मसाल्यातही त्रुटी आढळल्या आहेत.