‘वेळ आणि ठिकाण सांगा, तिथे येऊन पोलिसांना ठोकतो’, गँगस्टरचं फोनवर खुलं आव्हान; अखेर…
बिहारच्या मोतीहारी येथे कुख्यात गुंड कुंदन ठाकूरने पोलिसांना थेट आव्हान दिल्यानंतर चकमक उडाली. या चकमकीत कुंदन ठाकूर आणि त्याचा सहकारी प्रियांश दुबे ठार झाले, तर एसटीएफचे जवान राम यादव शहीद झाले. कुंदनने पोलिसांना धमकी देत वेळ आणि ठिकाण सांगण्यास सांगितले होते. पोलिसांनी त्याला घेरल्यानंतर गोळीबार झाला. कुंदन ठाकूर अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता.