Video: सर्पमित्र संजय पवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ फूट लांबीच्या सापाला मिळाले जीवनदान
गुजरातच्या वापी येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात रासायनिक सांडपाण्याच्या टाकीत पडून बेशुद्ध झालेल्या सापाला सर्पमित्र संजय पवार यांनी कृत्रिम श्वासोच्छवास (सीपीआर) देऊन वाचवले. दोन मिनिटांच्या प्रयत्नांनंतर साप शुद्धीवर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.