गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बस एकमेकांना धडकल्या; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथे मंगळवारी दोन एसटी बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ हून अधिक प्रवासी जखमी झाले. धुळे-सुरत बसने जळगाव बसला धडक दिल्याने भीषण आग लागली. पोलीस आणि अग्निशमन दलाने जखमींना रुग्णालयात दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मदतनिधी जाहीर केला आहे.