गुवाहाटीत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; स्थानिक संघटनांचा लव्ह जिहादचा आरोप
गुवाहाटी विद्यापीठातील २२ वर्षीय विद्यार्थिनी निमिषा ठाकूरियाचा होमस्टेमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या प्रियकराने आत्महत्येचा दावा केला, परंतु पोलिसांनी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत्यूपूर्वी निमिषाने आईला फोन करून आपल्याला मारण्याची भीती व्यक्त केली होती. पोलिसांनी प्रियकरासह होमस्टेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.