मुसळधार पावसाला वैतागलेल्या इसमाने थेट जिल्हाधिकाऱ्याकंडे केली इंद्र देवाची तक्रार
उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे त्रस्त झालेल्या सूरज तिवारी यांनी इंद्र देवाची तक्रार केली आहे. तिवारी यांनी जनसुनवाई समाधान पोर्टलवर तक्रार दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांना इंद्र देवाशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. सततच्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, रस्ते आणि शेतांमध्ये पाणी साचले आहे. या तक्रारीचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.