पार्टी IAS अधिकाऱ्यांची आणि सव्वा लाखाचं बिल सरकारकडे; पैसे भरायचे कुणी? उत्तर मिळेना!
हिमाचल प्रदेशच्या मुख्य सचिव प्रबोध सक्सेना यांनी होळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीचे १.२२ लाख रुपयांचे बिल सामान्य प्रशासन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले. विभागाने हे बिल मंजूर करण्यास नकार दिला. या पार्टीत ९७ जणांचा सहभाग होता. विरोधकांनी सरकारी खर्चावर टीका केली आहे. सध्या हे प्रकरण प्रलंबित असून, बिल कोण भरणार यावर चर्चा सुरू आहे.