आईच्या अंत्यविधीसाठी हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांची फक्त ५ तासांसाठी तुरुंगातून सुटका
बांगलादेशातील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास, जे हिंदूंच्या हक्कांसाठी लढत आहेत, त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी पाच तासांचा पॅरोल देण्यात आला. नोव्हेंबर २०२४ मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून ते तुरुंगात आहेत. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. चिन्मय दास यांच्या आईला शेवटचे पाहता आले नाही. सोशल मीडियावर त्यांच्या अंत्यविधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.