हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली..
कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागातील हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि अमेरिकेतील संसद सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. सोमवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका हिंदू महिलेनं कॅनेडियन पोलिसांवर हिंदू भाविकांना मारल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.