‘भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू कदाचित हिंदू नसेल’ – मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये 'वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी' परिषदेत हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत मुस्लिमांना वगळलेले नाही, असे सांगितले. २०१८ साली मुस्लिम समुदायाच्या सदस्यांबरोबर झालेल्या संभाषणाची आठवण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, "जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की भारतात एकही मुस्लीम नको, तर तो हिंदू नसेल." भागवत यांनी मानवतेच्या एकतेवर भर देत विविधतेचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले.