१० महिन्यांच्या चिमुकलीने वाचवले ५ जणांचे प्राण; पालकांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक!
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या १० महिन्यांच्या अलिन शेरीन अब्राहमने मृत्यूनंतर ५ जणांना जीवनदान दिलं. केरळमधील सर्वांत लहान अवयवदाती ठरलेल्या अलिनचे यकृत, दोन मूत्रपिंडे आणि कॉर्निया दान करण्यात आले. तिच्या पालकांनी दुःखाच्या काळात धीरोदात्तपणे अवयवदानाचा निर्णय घेतला. केरळ पोलिसांनी तिला गार्ड ऑफ ऑनर दिला. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या कृत्याचे समाजासाठी शक्तिशाली उदाहरण म्हणून कौतुक केले.