१८ पोलीस अन् एक SUV, अभिजीत दिपकेंना विमानातूनच पोलिसांनी कसं ताब्यात घेतलं?
१० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनासाठी दिल्लीला आलेले सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच ताब्यात घेतले. त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले आणि प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्यात आले. चौकशीनंतर प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.