कॅनडात २२ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, नेमकी घटना काय?
कॅनडामध्ये गुजरातच्या आणंदमधील विधी कल्पेशभाई मेघानी या २२ वर्षीय विद्यार्थिनी वास्तव्य करत होती. १५ मे रोजी तिची हत्या झाली आहे. १५ मे रोजी नियाग्रातील घरातून ती बाहेर पडली होती, तेव्हा तिच्यावर चाकूने हल्ला झाला. विधी शिक्षण घेत होती आणि नोकरी करत होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण अधोरेखित केले आहे.