आम आदमी पक्षाच्या देणग्या ६८ टक्क्यांनी घटल्या, तर बिजू जनता दलाच्या हाती देणगीच नाही!
आम आदमी पक्षाने २०२५-२६ या वर्षात १२ कोटी ९ लाख रूपये देणगी मिळाल्याचं जाहीर केलं आहे, ज्यात ६८ टक्क्यांनी घट झाली आहे. बिजू जनता दलाला या वर्षात एक रूपयाही देणगी मिळालेली नाही. आसोम गण परिषदेला ७ कोटी ६४ लाख, तेलगु देसम पार्टीला ५८ कोटी २५ लाख, आणि लोजपाला ३ कोटी २३ लाख रूपये देणगी मिळाली आहे.