अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ पोस्ट करत संताप; “ज्ञानु देशातला सर्वात मोठा गद्दार”
निवडणूक आयोगाने (ECI) काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेसाठी ऑनलाईन 'फॉर्म ६' मध्ये केलेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याचा दावा केला होता. मात्र, मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. अभिजीत दिपकेंनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. सुधारित 'फॉर्म ६' मध्ये मतदार नोंदणीसाठी पालकांची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.