अभिजीत दिपकेंची सुटकेनंतर पहिली पोस्ट; “पंतप्रधान नरेद्र मोदी भ्याड आणि जुलमी”
दिल्लीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईहून आलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं. न्यायालयाने त्यांची सशर्त सुटका केली आहे. सुटकेनंतर अभिजीत दिपकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांना भ्याड आणि जुलमी म्हटलं आहे.