अमेरिकी पर्यटक महिलेवर कर्नाटकातील होमस्टेमध्ये बलात्कार, कर्मचारी व मालकाला अटक
कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात एका होमस्टे सुविधेच्या कर्मचाऱ्यानं अमेरिकन पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित महिलेने कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी आणि होमस्टे मालकाला अटक करण्यात आली आहे. मालकाने गुन्हा लपवण्यासाठी इंटरनेट बंद केले होते. पीडित महिला अमेरिकन दूतावासाच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली. भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.