“पटेल समाजातील अनेक तरुण लग्नासाठी अयोग्य”, आनंदीबेन पटेल यांच्या मुलीचं विधान!
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या कन्या अनार पटेल यांनी पटेल समाजातील तरुणांच्या वर्तनावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अनेक पटेल तरुण विवाहासाठी योग्य नाहीत, त्यामुळे पटेल समाजातील मुली इतर समाजातील मुलांशी लग्न करतात. त्यांनी महिलांना संघटन मजबूत करून योग्य पावलं उचलण्याचं आवाहन केलं. तसेच, तरुणांनी शिष्टाचार पाळून विनम्रपणे बोलायला शिकावं, असंही त्यांनी नमूद केलं.