धीरेंद्र शास्त्रींचं शाकाहाराचं आवाहन भाजपाच्या नेत्याने धुडकावलं; “बाहेरुन येणाऱ्यांनी…”
पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं शाकाहराबाबतचं आवाहन धुडकावलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी बंगाली लोकांनी दुर्गा पूजा दरम्यान मांसाहार करू नये असं म्हटलं होतं. भट्टाचार्य यांनी उत्तर देताना सांगितलं की, बंगाली लोक काय खायचं ते बाहेरून येणारे ठरवू शकत नाहीत. काली मातेला बकरीचं मटण नैवैद्य दाखवलं जातं, ही परंपरा आहे.