“ज्ञानेश कुमार चोर, दरोडखोर आहेत, त्यांनी मतचोरी केली”; ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकाधिकारशाही राबवण्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून निवडणूक आयोगातील इतर आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्यानंतर ममता बॅनर्जींनी संताप व्यक्त केला. त्यांनी ज्ञानेश कुमार यांना चोर आणि दरोडेखोर म्हणत राजीनाम्याची मागणी केली. मतचोरीच्या आरोपांवरून लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.