सात महिन्यांत २५ जणांशी लग्न करुन लुटणाऱ्या तरुणीला अटक, पोलिसांची कारवाई
भोपाळमध्ये पोलिसांनी २३ वर्षीय अनुराधा पासवानला अटक केली आहे. मागील सात महिन्यांत तिने २५ तरुणांशी लग्न करून त्यांना लुटल्याचा आरोप आहे. अनुराधा एका टोळीचा भाग असून, लग्नानंतर ती घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळून जात असे. विष्णु शर्मा नावाच्या तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून तिला पकडले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.