मैसूरचे उद्योजक हर्षवर्धन किक्केरी त्यांची पत्नी आणि मुलगा तिघांचे मृतदेह घरात आढळले
मैसूरचे उद्योजक हर्षवर्धन किक्केरी (वय ५७), त्यांची पत्नी श्वेता (वय ४४) आणि मुलगा रुप (वय १४) यांचे मृतदेह वॉशिंग्टन येथील त्यांच्या घरात आढळले. प्राथमिक तपासानुसार हे हत्या आणि आत्महत्येचे प्रकरण असू शकते. हर्षवर्धन यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. हर्षवर्धन किक्केरी हे Holoworld रोबोटिक्स कंपनीचे सीईओ होते. या घटनेत त्यांचा सात वर्षांचा मुलगा वाचला आहे.