“हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार यांची पल्स डाऊन”; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरने सांगितला थरार
मागच्या आठवड्यात फ्लायदुबईच्या विमानात कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसामुळे १७० हून अधिक लोकांचे प्राण वाचले. को पायलट हमाम अल हमामीने मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता आणि विमान पाडण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेतही मच्छार यांनी विमान चालवलं. प्रवासी डॉ. शुता मुसायेव यांनी मच्छार यांना मदत केली आणि हल्लेखोराला पकडून बांधलं. मच्छार यांच्या धैर्यामुळे सर्व प्रवासी वाचले.