डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी युद्ध का सुरु केलं? इयान बर्मर यांनी सांगितलेलं कारण काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी २७-२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार केलं. इराणशी सुरु असलेल्या युद्धाला ३५ दिवसांनी युद्धविराम दिला गेला, जो आता वाढवण्यात आला आहे. ट्रम्प यांना हे युद्ध लवकर संपेल अशी अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही. इयान बर्मर यांच्या मते, ट्रम्प यांना इराणमध्ये हस्तक्षेप करून तिथे सत्ता बदलायची होती, पण त्यात ते अपयशी ठरले.