एलॉन मस्क यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले; “हे खरंच चिंताजनक”
स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारतात स्टारलिंकला अडवलं जातंय असा आरोप केला आहे. त्यांनी थेट मुकेश अंबानी यांच्यावर टीका करत, भारताचे खरे मालक आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधींनी मस्क यांच्या पोस्टला उत्तर देत त्यांचे स्वागत केले. मस्क यांनी राहुल गांधींचे आभार मानले. स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला नियामक अडचणींमुळे विलंब होत असल्याचे मस्क म्हणाले.