Video: इथेनॉलमुळे गाड्यांचं मायलेज कमी होतं? पेट्रोलियम मंत्र्यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचा प्रश्न निर्माण झाला आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल-डिझेलचा मुद्दा चर्चेत आला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं का, यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, इथेनॉल रेसिंग कार्समध्ये वापरलं जातं आणि मायलेज कमी होण्याचं कारण इतरही असू शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वाहनांचा विमा नसल्याच्या गैरसमजावरही त्यांनी खुलासा केला.