पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि पतीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
कर्नाटकातील बागलकोटच्या जामखंडी येथे २५ वर्षीय प्रवीण नावाच्या तरुणाचा लग्नाच्या विधी दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.